jitendra awhad esakal  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP: ..अन् जितेंद्र आव्हाड 'ती' नोटिस घेऊन मध्यरात्री पोहचले विधानसभा अध्यक्षांच्या दारी

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अजित पवारांसह ९ आमदारांनी केलेल्या बंडाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केल्याचं स्पष्ट केलं. तर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड हे ती आपात्रतेची नोटिस घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी पोहचले आहेत.

रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की, 9 आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. शरद पवार यांना अंधारात ठेवून ही कृती केलेली आहे. आमच्या एका सदस्याने आम्हांला याबद्दल तक्रार केली. ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटीकडे दाखल केलीय. दांडेगावकर साहेबांच्या अध्यक्षेखालील कमिटीकडे तक्रार पाठवण्यात आली. त्यांनी यासंबंधीची नोंद त्यांच्याकडे केली आहे.

''तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. यासंबंधी ईमेलवर तक्रार पाठवली असून फिजिकल कॉपी पाठवत आहे. ती त्यांना काही तासांमध्ये मिळेल. शिवाय मी स्वतः चार वेळा नार्वेकरांना संपर्क साधण्याचा प्रय़त्न केला असून हे पीटीशन व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे'', असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

हीच नोटिस घेऊन जितेंद्र आव्हाड हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी मध्यरात्री पोहचले. ते आपल्या कारमधून नार्वेकर यांच्या घराबाहेर नोटीस घेऊन थांबले मात्र नार्वेकर बंगल्यावर नाहीत, असं सांगण्यात येतंय. अजित पवार गटावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

यादरम्यान विरोधीपक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मी असेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT