Ajit Pawar NCP Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP : पक्ष आमचाच, आमदार-खासदारही आमच्यासोबत, कुणीही फुटलेलं नाही; अजित पवारांची प्रतिक्रिया

दत्ता लवांडे

अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करून विरोधीपक्षनेते पदावरून थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट झाला असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा या शपथविधीला पाठिंबा नाही त्यामुळे अजित पवार यांनी शरद पवारांना डावलून शपथ घेतली असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर त्यांनी सगळा पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावासुद्धा केला आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "राष्ट्रवादीच्या सगळ्याचे आम्हाला सहकार्य आहे , त्यात सगळेच आले. पक्षातील सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, खासदारही आमच्यासोबत आहेत आणि पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फूट झाली नाही. येणाऱ्या निवडणुका सुद्धा आम्ही घड्याळ या चिन्हावर लढवणार आहोत." असं ते म्हणाले.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपले आहेत. राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असून पक्षांतील सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला. या सरकारमध्ये आमच्या पक्षाच्या पहिल्या मंत्री झाल्या याचा आम्हाला आनंद आहे. असं राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT