devendra fadnavis eknath shinde ajit pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''...तर वेगळा विचार करावा लागेल'', अजित पवार गटाकडून थेट भाजपला इशारा

संतोष कानडे

मुंबईः अजित पवारांनी भाजपसोबत येणं शिंदेंच्या शिवसेनेला आधीच रुचलेलं नव्हतं. त्यात पुन्हा लोकसभा निकालानंतर तर महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. सातत्याने येणाऱ्या विधानांमुळे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे.

आरएसएसच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवारांवर झालेल्या टीकेमुळे महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. अजित पवारांना सोबत घेण्याबाबत भाजपने पुन्हा विचार करावा, अशी विधानं शिवसेना नेत्यांकडून येत आहेत. लोकसभा निवडणुकीमधील पराभवाला अजित पवार गटाला जबाबदार धरलं जात आहे. अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पिछाडीवर जावं लागलं, असं जाहीरपणे बोललं जात आहे.

महायुतीमध्ये सुरु असलेल्या धुसफुशीनंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं की, भाजपच्या बैठकीमध्ये महायुतीच्या पराभवाचं कारण अजित पवार असल्याचं सांगितलं गेलं. परंतु जर अजित पवारांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. अमोल मिटकरींच्या या विधानामुळे महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं दिसून येतं आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटाला लक्ष्य करत, त्यांच्या पक्षाने आपल्याला मदत केली नाही.. असा आरोप त्यांनी जाहीरपणे केला. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अजित पवारांची बाजू घेतली आहे. ते म्हणाले की, अजित पवारांना भाजप नेते बळीचा बकरा करत आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला कमी मतं पडली त्याला अजित पवार जबाबादार आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 फेब्रुवारी 2026

Satara Accident: कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार; टोपजवळील अपघातात पती गंभीर जखमी, कऱ्हाड तालुक्यातून हळहळ व्यक्त!

Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

SCROLL FOR NEXT