Ajit Pawar and Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : राष्ट्रवादीकडून ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल; नार्वेकरांनी हेअरिंग घेण्याची मागणी

संतोष कानडे

मुंबईः अजित पवारांसह ९ आमदारांनी केलेल्या बंडाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केल्याचं स्पष्ट केलं.

रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील म्हणाले की, 9 आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. शरद पवार यांना अंधारात ठेवून ही कृती केलेली आहे. आमच्या एका सदस्याने आम्हांला याबद्दल तक्रार केली. ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटीकडे दाखल केलीय. दांडेगावकर साहेबांच्या अध्यक्षेखालील कमिटीकडे तक्रार पाठवण्यात आली. त्यांनी यासंबंधीची नोंद त्यांच्याकडे केली आहे.

''तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. यासंबंधी ईमेलवर तक्रार पाठवली असून फिजिकल कॉपी पाठवत आहे. ती त्यांना काही तासांमध्ये मिळेल. शिवाय मी स्वतः चार वेळा नार्वेकरांना संपर्क साधण्याचा प्रय़त्न केला असून हे पीटीशन व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे'', असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

पाटील पुढे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की, उद्या या पीटीशनसंदर्भात हेअरिंग घेऊन आमची बाजू ऐकून घ्यावी. निवडणूक आयोगालाही याबाबत कल्पना दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत आहेत.

त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाचं समर्थन केलेलं आहे. ९ आमदार ही पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी केलेली कृती राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांना न सांगता केलेली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी याबबात आम्हांला लवकरात लवकर बोलवावं, ही आमची मागणी आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT