Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवार उपमुख्यमंत्री होणार? पुन्हा मोठा राजकीय भुकंप

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

युगंधर ताजणे

Ajit Pawar NCP Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार हे विधानभवनावर दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आपली वेगळी भूमिका मांडली होती.

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित दादांच्या भूमिकेविषयी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, विरोधी पक्ष नेता म्हणून विधीमंडळाच्या सदस्यांची बैठक बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे आणि आजचा विषय काय आहे याची सविस्तर माहिती आलेली नाही. संध्याकाळपर्यंत लोक येत-जात आहेत, यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही असे पवार म्हणाले होते.

दरम्यान, विरोधीपक्ष पवार यांनी देवगिरी या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्विकारावे अशी अग्रही भूमिका घेतल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पुण्यात असलेल्या शरद पवारांनी या बैठकीबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल राजभवनावर दाखल झाले आहेत. आज सायंकाळी शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ९ आमदार देखील शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजाच्या राजकारणात पुन्हा मोठा भुकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT