Congress Party News 
महाराष्ट्र बातम्या

Congress: राष्ट्रवादीतील फुटीनंतर 'काँग्रेस' सक्रिय, आखली नवीन योजना! प्रचाराला सुरूवात...

Sandip Kapde

Congress Party News:  राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मोठी फूट पडली आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी आज काही आमदारांसह सरकारला पाठींबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर ८ आमदरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शरद पवार यांना हा मोठा धक्का मानल्या जात आहे. (Latest Marathi News)

दरम्यान राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस सक्रिय झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. काँग्रेस म्हणू, काँग्रेसच आणू..., असा प्रचार काँग्रेसकडून राज्यात करण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडाचा काँग्रेस फायदा घेण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण, सतेज पाटील यांनी हे ट्वीट केले आहे. आता हेच अंतिम सत्य आणि एकमेव शाश्वत!'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,' असा प्रचार करण्यात येत आहे.

अजित पवार यांचा मोठा बंड -  

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह आपलेच असल्याचा दावा केला. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगितले.

अजित यांच्यासोबत राजभवनात गेलेल्या काही आमदारांचेही फोन आल्याचा दावा शरद पवार यांनी केला. आमदारांनी आम्हाला वेगळं काही सांगून फोन केल्याचा दावा केला. यातील काहींनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे म्हटले आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शिंदे यांनी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती-

राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेविरोधात बंड केले. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. भाजपसोबत मिळून एकनाथ शिंद यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह नवीन सरकार स्थापन केले.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले. आता वर्षभरानंतर पुन्हा त्याच दृश्याची पुनरावृत्ती अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत केली आहे. अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह शरद पवार यांच्या विरोधात बंड केले आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

Donald Trump Tariff Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, आता 'या' क्षेत्राला केले लक्ष्य; १ नोव्हेंबरपासून जगभरात होणार लागू

Nanded Love Affair : प्रेमसंबंधातून प्रेमीयुगुलानं प्राशन केलं विष; घरच्यांचा होता विरोध, असं काय घडलं? दोघांना उचलावं लागलं टोकाचं पाऊल!

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

Cough Syrup Testing: कफ सिरपचे नमुने घेण्‍यास सुरुवात ‘एफडीए’ पुण्यात इतर कंपन्‍यांच्या औषधाचीही करणार तपासणी

SCROLL FOR NEXT