jitendra awhad esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar NCP News : अजित पवारांच्या बंडानंतर जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन! 'या' पदावर केली नियुक्ती

रोहित कणसे

अजित पवार यांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान विरोधीपक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्य प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. तसेच इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत अशी भूमिका जाहीर केली आहे.

यानंतर राष्ट्रवाद पक्ष कोणाकडे आहे याबद्दल जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल तो त्यांना लागू होईल असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले होते की, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे सांगितले होते. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती याचा उल्लेख केला. यासोबत त्यांनी राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे असा उल्लेख केला होता.

पवार पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली याचा अर्थ त्यांनी केलेला आरोप वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्या बद्दल त्यांनी आरोप केले होते, त्या सगळ्यांना मुक्त केलं यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे असे शरद पवार म्हणाले.

या आमदारांनी घेतली शपथ

अजित पवारांसोबत इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, यामध्ये छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT