Sharad Pawar NCP Latest News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: पुतण्याने साथ सोडली, हक्काचे माणसं सोडून गेले, मात्र हे नेते आजही शरद पवारांच्या पाठीशी उभे

Sandip Kapde

Sharad Pawar:  रविवारची दुपार महाराष्ट्रासाठी राजकीय वादळ घेऊन आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मोठा टर्न घेत काका शरद पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली. हे काही किरकोळ बंड नव्हते. अजित पवार आणि शरद पवार यांच्या या संघर्षाने महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलले.

अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. तर शरद पवार यांनी बंडखोरी केलेले आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान शरद पवार यांच्यासोबत कोणते नेते आहेत याबाबत जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, सुनिल भुसारा, अनिल देशमुख, सोनिया दुहन, अंकुश काकडे, आमदार बाळासाहेब पाटील, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, फौजिया खान, हे नेते शरद पवार यांच्याबरोबर असल्याची माहिती मिळत आहे.

काय म्हणाले शरद पवार?  

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हटले आहे. आज त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी भाजप सरकारमध्ये शपथ घेतली आहे. अजित पवारांनी बंडखोरी केली आहे. ते माझ्याशी बोलले नाहीत. यावेळी मी एकही गुगली टाकली नाही. पत्रकार परिषदेसाठी येथे येण्यापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन आले आणि एकजुटीचा संदेश मिळाला. (ajit pawar ncp news)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतरांनी मला फोन केल्याचे त्यांनी सांगितले. आज जे काही झाले त्याची मला चिंता नाही. 2024 ची निवडणूक एकत्र लढू आणि जिंकू. उद्या मी जाहीर सभा घेणार आहे. दलित समाजाच्या एका कार्यक्रमाला जाणार, असे शरद पवार म्हणाले. आजच्या शपथविधीशी माझ्या सबंध नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar: धक्कादायक! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, मनसे आक्रमक

Gokul Election 2026 : 'अदृश्य शक्ती कोण? नाव सांगा, मग बोलते'; शौमिका महाडिक यांचे 'गोकुळ'च्या रणधुमाळीत थेट आव्हान, भाजपच्या सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

Marathi News Live Updates : अमित शाह आज एएनटीएफ (ANTF) परिषदेचे उद्घाटन करणार

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

SCROLL FOR NEXT