Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

NCP Sharad Pawar News : तेल लावलेले पैलवान पुन्हा आखाड्यात! आज पवारांची कराडमध्ये जाहीर सभा

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आठ इतर आमदारांसह काल सरकारमध्ये सहभागी होतं मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी पुनःश्च हरिओम केला आहे. पवार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.

शरद पवार आज, सोमवारी सकाळी आठ वाजता कराडसाठी रवाना होणार आहेत. याठिकाणी शरद पवार कराडमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार आहेत.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप घडवल्यानंतर शरद पवार यांनी मी जनतेच्या न्यायालयात जाणार आणि पुन्हा पक्ष उभा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शरद पवार कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर येथे पवारांची जाहीर सभा देखील होणार आहे.

सुरुवातील शरद पवार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची प्रीतीसंगम येथील समधीचं दर्शन घेतील. त्यानंतर सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची बैठक होईल आणि त्यानंतर एका मेळाव्यात शरद पवारांची जाहीर सभा होईल.

राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरूवात

दरम्यान अजित पवारांसह ९ आमदारांनी केलेल्या बंडाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाईला सुरूवात केली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केल्याची माहिती दिली. ९ आमदारांची कृती बेकायदेशीर आहे. शरद पवार यांना अंधारात ठेवून ही कृती केलेली आहे. आमच्या एका सदस्याने आम्हांला याबद्दल तक्रार केली. ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटीकडे दाखल केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली असून यासंबंधी ईमेलवर तक्रार पाठवली असून फिजिकल कॉपी पाठवत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT