Raj Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: 'सुप्रिया सुळे उद्या केंद्रात मंत्री...', राज ठाकरेंना वाटतो बंडा मागे पवारांचा हात

मी थोड्याच दिवसात मेळावा घेऊन याबाबत बोलणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या संपूर्ण घटनेनंतर शरद पवार अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. तर या घटनेवर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. (Latest Marathi News)

या राजकीय घडामोडीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, 'मी काल माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन ते अडीच वर्ष जे काही राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणं होतं चाललंय. या नेत्यांना मतदारांशी काही घेणदेण नाही. मला असं वाटत आहे की या सर्वाचा विचार नागरिकाने करणे गरजेचे आहे. तर मी थोड्याच दिवसात मेळावा घेऊन याबाबत बोलणार आहे' असं राज ठाकरे म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

तर 'राष्ट्रवादीचे मोठे नेते असा निर्णय घेतील हे पटतं नाही, पवार साहेब काही म्हणत असले की माझा या घटनेशी काही संबध नाही तरीदेखील हे मोठे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरीदेखील मला आश्चर्य वाटणार नाही' असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

मी मेळावा घेईल तेव्हा सर्व गोष्टी सांगेन, राज्यातील सर्व गोष्टींवर मी बोलेन सध्या जे राजकारण सुरू आहे, ते अतिशय किळसवाणं आहे.

शरद पवार कितीही म्हणाले माझा या घटनेशी काही संबध नाही तरीदेखील दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल पटेल असे मोठे नेते असेच जाणार नाहीत. त्यांना पाठवल्याशिवाय ते जाणार नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

तर हा सर्व ड्रामा पहाटेच्या शपथविधी पासून सुरू झाला आहे. राजकारणात कशाला सोयरसूतक राहील नाही असंही ते म्हणाले आहेत. तर राज्याच्या राजकारणात कोण कोणाचा मित्र आणि कोण शत्रू हे समजत नाही असंही राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT