Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच'! प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांचा अजित पवार गटाला थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवत असलेले अजित पवार आज सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फुटीर गटाला इशारा देत, ‘आम्ही शरद पवार यांच्या सोबत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचीच आहे,’ अशी ठाम भूमिका घेतली.

सत्तानाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांबाबत कठोर पक्षविस्त भंगाची कारवाई करणार असल्याचे सूतोवाच केले. पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘पक्षाच्या मान्यतेशिवाय काही सदस्यांनी हा शपथविधीचा कार्यक्रम केला आहे. या घटनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही निषेध करत आहोत.’’

ज्या नऊ सदस्यांनी शपथ घेतली त्यांनी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन पलीकडे पाऊल टाकले आहे, असे सांगताना जयंत पाटील म्हणाले, ‘‘उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही.

त्यांनी कशावर सह्या केल्या असतील याची माहिती त्यांना नसावी, तर त्यातील आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे त्या सर्वांची भूमिका काय आहे हे नक्की स्पष्टपणे आमच्यासमोर आल्यावर त्यावर आम्हाला विचार करावा लागेल.

प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली. याबाबतचे पत्र विधानभवनात पाठवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. ‘‘शिंदे व फडणवीस सरकारला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नाही.

आमच्या पक्षाच्या आदेशाचे किंवा धोरणाचे उल्लंघन केले आणि ज्यांनी शपथ घेतली त्यांनाही आमच्या पक्षाचा पाठिंबा नाही. ते आमचे सगळे सहकारी आहेत, पण कायदेशीर अडचणी आल्या तर त्याला त्यांना तोंड द्यावे लागेल,’’ असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT