Ajit Pawar never pulled the mic from me Uddhav Thackeray targeted Chief Minister Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Dasara Melava: 'अजित पवारांनी कधी माईक हिसकावून घेतला नाही'; ठाकरेंचा CM शिंदेंवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज मुंबईतील शिवाजीपार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना अजित पवारांनी शेजारी बसून कधीही माझ्यासमोरचा माईक त्यांनी खेचला नव्हता असा शब्दात शिंदे-फडणवीस युतीवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना पळवायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात मैदान मिळाल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की मी लक्ष घातलं असतं तर यांना हे मैदान मिळालं नसतं. बापाची पेंड आहे.. गद्दार तर आहेतच पण शिवाजी पार्क मिळू द्यायचं नाही, धनुष्यबाण पाहीजे, बाळासाहेब पाहीजेत, शिवसेना प्रमुखपद पाहीजे अरे पण घेऊन जाणार कुठे..हे जाऊ देतील का? आज माझं आव्हान आहे एका व्यासपीठावर एक सभा लावू..तुम्ही भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करुन दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना चार-पाच प्रेस कॉन्फरन्स झाल्या असतील, त्यामध्ये बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार शेजारी बसलेले असायचे, कधीही माझ्यासमोरचा माईक त्यांनी खेचला नव्हता, त्यांनी कधीही कानामध्ये उत्तर सांगितलं नाही. मुद्दाम सांगतोय कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मान-सन्मान देऊन अडीच वर्ष सोबत केली. अनेकांनी सांगितलं कॉंग्रेसकडे लक्ष ठेवा, शरद पवार तर तुम्हाला माहिती आहेत, पण अडिच वर्ष त्यांच्याकडे लक्ष देताना हेच निघून गेले, मग गद्दार कोण? असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2025

Suryakumar Yadav : खिलाडूवृत्तीपेक्षा भावना महत्त्वाच्या; हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत, नेमकं काय म्हणाला?

Satara fraud:'बहुलेतील एकाची १३ लाखांची फसवणूक'; बनावट कागदपत्रांद्वारे माेटारीची विक्री, सहा जणांवर गुन्हा

Nagpur Crime: नागपुरात कचरा गाडी चालकाचा खून, जुन्या वादातून घडली घटना...

SCROLL FOR NEXT