NCP Hasan Mushrif Takes Oath 
महाराष्ट्र बातम्या

NCP Hasan Mushrif Takes Oath: अल्ला साक्ष शपथ घेतो की.. हसन मुश्रीफानी घेतली मंत्रिपदाची शपथ

Sandip Kapde

Hasan Mushrif NCP : रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केले, त्यानंतर ते इतर आमदारांसह राजभवनात पोहोचले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असतील. पवारांव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे 18 आमदारही राजभवनात पोहोचले असून, त्यापैकी अनेकांना मंत्री केले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. "अल्ला साक्ष शपथ घेतो की...", अशी शपथ मुश्रीफ यांनी घेतली.

2019 मध्येही अजित पवारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजभवनात पहाटे शपथ घेतली. मात्र, शरद पवार सक्रिय झाल्यानंतर ते परत आले आणि त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना होऊन महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच वर्षे सरकार चालले. (Ajit Pawar News ncp)

महाराष्ट्र राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शपथ घेतली. त्यांना मंत्रीही करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी बंडखोरी केली आहे. अजित पवार यांच्या या शपथविधीला शरद पवार यांचा पाठींबा नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT