Ajit Pawar News Updates Ajit Pawar
महाराष्ट्र बातम्या

OBC विधेयक सोमवारी पटलावर मांडू; अजितदादांची विधानसभेत ग्वाही

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. हे सरकार या आरक्षणासंदर्भात गाफील असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर आम्ही पुरेपुर प्रयत्न करत असून कायदेशीर बाबींमुळे या अडचणी येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. आपण दोन्ही बाजूंनी ओबीसींसाठी पुन्हा प्रयत्न करु. आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, हे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. यासंदर्भातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देत म्हटलंय की, ओबीसी अरक्षणाबाबत आम्ही विधेयक तयार करत आहोत, ते सोमवारी पटलावर मांडू. या प्रश्नावर मार्ग निघावं हीच इच्छा आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, आम्ही मध्य प्रदेशबाबतची उदाहरणे मांडली आहेत. त्यांच्याकडूनही माहिती मागवली आहेत. त्यांना कशाप्रकारे फायदा झाला, ते पाहून त्याचप्रकारचं बिल आम्ही तयार करतोय. त्यासाठी आज कॅबिनेटमध्ये मंजूरी देतोय. सोमवारी सभागृहात दाखवणार आहे. ते मागच्या वेळेप्रमाणेच मंजूर करुन घेऊ. त्यानंतर आपण निवडणूक आयोगाला कळवू. मागे आपण आरक्षणासाठी सगळं काही केलं पण कायद्याने तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. त्याला आपण काही करु शकत नाही. मग उगाच असा गैरसमज होतो की आमच्यावर कुणाचा तरी दबाव आहे पण, आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आणि आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालू शकत नाही.

हवं तर स्थानिक स्वराज संस्थांवर प्रशासक ठेवू पण ओबीसी आरक्षणासहितच निवडणूका घेऊ. आज संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकी नंतर उद्या बिल आणू, असं आश्वासन अजित पवार यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Kailas Patil : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’ या सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यावर आमदार कैलास पाटलांची घणाघाती टीका

Pune News : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत एनडीए कॅडेटने संपविले जीवन

Latest Marathi News Live Update : गोळीबार प्रकरणातील आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी

Palghar News : पालघरमध्ये ठाकरे गटाला भगदाड; गटनेता कैलास म्हात्रेसह चार नगरसेवक भाजपाकडे

Donald Trump यांचे Nobel चे स्वप्न धुळीस मिळाले; व्हाईट हाऊसचा संताप उफाळला, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT