ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

सभागृत सदस्यांनी तारतम्य ठेवून वागले पाहिजे : अजित पवार

सगळा महाराष्ट्र मला ३० वर्षे ओळखतो, अजित पवार चार दिवसात राज्य विकून खाईल.

निनाद कुलकर्णी

मुंबई : आपल्याला जेव्हा विधानसभेत (Vidhansabha) पाठवलं जातं तेव्हा तारतम्य ठेवून वागलं पाहिजे, आरोप प्रत्यारोप होतच असतात असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखला जातो, प्रत्येकाला संरक्षण देणं ही (Security ) जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान मात्र, एका गोष्टीचं भान असायला हवं. सगळा महाराष्ट्र मला ३० वर्षे ओळखतो, अजित पवार (Ajit Pawar) चार दिवसात राज्य विकून खाईल असे सांगत ते म्हणाले की, मी कुणाच्या अध्यात मध्यात नसतो. फक्त विकासकामाचं पाहतो, मग ते कुणाचंही असो, मी मनापासून लक्ष घालतो असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. या ह्ल्ल्याची माहिती घेऊन त्यात अधिकची माहिती फडणवीस यांनी दिली आहे, ती गांभीर्याने स्वीकारली असून यात जे कुणी दोषी असतील त्यांची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे. (Ajit Pawar On BJP MLA Gopichand Padalkar Attack )

पडळकरांनी या हल्ल्याच्या कटाचा गंभीर आरोप पोलिस अधीक्षकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केला आहे. त्यांनी आरोप करताना म्हटलं की, हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, डीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT