Ajit Pawar  Ajit Pawar
महाराष्ट्र बातम्या

मी पण कामं करतो, पण फोन चालू असताना कधी कॅमेरा लावला नाही - अजित पवार

सोशल मीडियावर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोनवरून आदेश देताना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : सोशल मीडियावर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे फोनवरून आदेश देताना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यावरून त्यांना अनेकजण सोशल मीडियावरून ट्रोल करताना दिसत आहेत. दरम्यान, मी पण काम करत होतो पण फोन चालू असताना कधी कॅमेरा लावायला सांगितला नाही असं राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

(Ajit Pawar On CM Eknath Shinde)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये ते पंढरपूरच्या वारीतील आजारी वारकऱ्याची चौकशी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर चांगला उपचार करा, आणि शक्य नसेल तर खासगी मोठ्या रूग्णालयात हलवा मी त्यांचा सगळा खर्च करतो असं ते म्हणताना दिसतात. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते एका अधिकाऱ्याला फोन लावून पूराची माहिती घेत आहेत. तर सदर अधिकाऱ्याला उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देताना दिसत आहेत. यानंतर त्यांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

यानंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मी पण अधिकाऱ्यांना फोन लावायचो आणि आदेश द्यायचो पण कधी फोन चालू असताना कॅमेरा चालू करायला लावला नाही अशी टीका पवार यांनी केली आहे. कुठलंही काम माझ्याकडे आलं तर मी लगेच फोन करायला लावतो पण लगेच कॅमेरा पण लाव असं कधी म्हणत नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT