Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "केसरकर आहेत म्हणून शालेय शिक्षण मंत्रालय सुरु, नाहीतर..."; अजित पवारांनी घेतली फिरकी

Sandip Kapde

Ajit Pawar: राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. अजित पवार म्हणाले, आम्ही अनेक शिक्षणसंस्था चालवतो. आम्ही देखील अनेक अडचणींचा सामना करतो.  राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी बोलत आहे. राज्य सरकार सर्वात जास्त खर्च शिक्षण विभागावर करतो. मात्र हा खर्च सत्कारणी लागला पाहीजे.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर मेटाकुटीला येतात. ते आहेत म्हणून शालेय शिक्षण मंत्रालय सुरु आहे. ते बोलत असताना मी शेवटचं सांगतो, मी शेवटचं सांगतो म्हणत होते. मी आणि मुख्यमंत्री मोजत होतो. मात्र शेवट काही संपत नव्हता, असे शिक्षणमंत्री आपल्याला लाभले आहेत.

३० हजार शिक्षकांची आपण भरती घेणार आहोत. यामध्ये मेरिटला महत्व आहे. भरती करायला लागलो की महिला मेरीट म्हणून समोर येतात. पुरुष कुठे जातात काय माहित. आता ३० हजार जागांमध्ये २० हजार महिला आणि १० हजार पुरुष लागतील, १०० टक्के हे होणार आहे. कारण पुरुष मंडळींचं लक्ष नको तिकडे जास्त जात असते. त्यामुळे मेरिट राहले बाजुला अन् लक्ष चाललं कुणीकडं, ही शक्यता नाकारता येत नाही, असे अजित पवार म्हणाले.

शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे. पुरस्कार मिळालेले शिक्षक आपले ब्रँड अॅम्बेसिटर आहेत, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. कारण हे पुरस्कार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिले जातात. ज्यांना पुरस्कार मिळालेत त्या शिक्षकांची मुले सुद्धा तुम्ही शिकवत असलेल्या शाळेत शिकत असावेत, असा विश्वास व्यक्त करतो, असे अजित पवार म्हणाले. यावेळी टाळ्या काही जास्त वाजल्या नाहीत, अशी फिरकी देखील त्यांनी घेतली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आरएसएस मुख्यालय, स्मृती भवन उडवून देऊ! धमकीच्या मेलनंतर नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, दोन तास केली तपासणी

भारतीय संघात खळबळ! आम्हाला काय ते स्पष्ट सांगा... 'सीनियर्स' थेट BCCI कडे पोहोचले, गौतम गंभीरला खिजगणतीतही नाही धरले...

Latest Marathi News Live Update : प्रशासनाच्या आश्वासनानंतर थकीत ऊस बिलासाठीचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Mumbai News: अंधेरीत श्वानाची निर्घृण हत्या! प्राणीप्रेमींमध्ये संताप, कारवाईची मागणी

भारतासाठी कसोटी पदार्पणाच चमकलेला Manav Suthar आता इंग्लंडमध्ये खेळणार! 'या' संघासाठी मैदानात उतरण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT