Eknath Shinde Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांवर अजित पवारांची खोचक टीका; म्हणाले शिंदे...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच शिंदे सरकारच्या दिल्ली वारीवर खोचक टीका केली. (Ajit Pawar news in Marathi)

मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला रवाना होणार आहे. आज त्यांचा सहावा दिल्ली दौरा होणार आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात सर्व निर्णय दिल्लीत व्हायचे. भाजप सरकारचे देखील निर्णय दिल्लीत होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णय मुंबईत होतात. शरद पवार मुंबईत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाच्या वेळी मुंबईत निर्णय व्हायचे. ममता बॅनर्जी यांचे निर्णय कोलकात्याला होतात. पक्ष कोणता आहे हे महत्त्वाचं आहे. आता शिंदे यांचे निर्णय दिल्लीत होतात, त्याला आपण काय करणार असा टोला अजित पवार यांनी लगावला.

राज्यातील विकास कामासंदर्भातील प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. लातूर आणि वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासंदर्भात बोललो. त्याला मान्यता देण्यासाठी चर्चा केली. तसेच लवकर मंत्रीमंडळ विस्तार केला तर पालकमंत्री विकासकामांचा आढावा घेऊ शकतात हे सांगितलं. तसेच अधिवेशन लवकर घेण्याची मागणी केल्याचे अजित पवार यांनी म्हटलं.

अर्थसंकल्पातच नांदेडच्या हळद संशोधन केंद्राचा निर्णय़ घेतला होता. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय आधीच घेतला होता. तो त्यांनी पुन्हा घेतला. नवीन वीजेच्या बिलायाबाबत निर्णय घेतला. मात्र तो आपल्या लक्षात आला नाही. ते पाहून सांगता येईल, असही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राज्यात शिंदे सरकार की भाजप सरकार यावर अजित पवार म्हणाले की, भाजपकडे ११५ आमदार आहेत. तर शिंदे यांच्याकडे ४० आमदार आहेत. सहाजिकच भाजपचं सरकारमध्ये वर्चस्व राहणार हे स्पष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT