Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: मनोज जरांगेंना समजवण्यात कमी पडतोय, अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Maratha Reservation: काल (शुक्रवार) रात्री मराठा आरक्षणाबाबत बैठक झाली. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले होते. रात्री साडेदहा वाजता सह्याद्रीवर शिष्टमंडळाने सरकारसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, रात्री उशीरापर्यंत मिटींग सुरु होती. मला जास्त काही माहिती घेता आली नाही. मनोज जरांगे यांच्याशी मुख्यमंत्री बोलत आहेत. याप्रकरणी जीआर देखील काढला पण त्यांना तो मान्य नाही. सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

सरकारने निर्णय घेतला तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे. आम्ही त्यांना समजवण्यात कमी पडतोय. त्यामुळे सरकारने आज शिष्टमंडळ पाठवले आहे. कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे पवार म्हणाले.

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आता सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळा आंतरवली सराटी येथे चर्चा करत आहेत. (Latest Marathi News)

काल रात्री बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगवाले, माजी आमदार अर्जुन खोतकर, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता डॉ. डॉ. बिरेंद्र सराफ, बैठकीदरम्यान मुख्य सचिव मनोज सौनिक तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Statement : 'मतदार संघात जाऊन बेईमान खासदारांना धडा शिकवणार, उद्धव ठाकरे-पवारांशी चर्चा'; संजय राऊत संतापले

Solapur Politics: भाजपच्या मतदारांवर आमदार-पदाधिकाऱ्यांचा वॉच; नगरसेवक सकाळी आठला ‘हेरिटेज’मध्ये जमणार, ११च्या आत मतदान करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : भाजप नगरसेवकांची एकजूट कायम ठेवण्यासाठी बावनकुळे यांची बैठक

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 'मे' चा हप्ता जमा, पण 'या' दीड लाख महिला राहणार वंचित; नेमकं काय घडलं?

Pune Shirdi Express: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी दररोज धावणार नवी एक्स्प्रेस; रेल्वे दौंड, अहिल्यानगर, राहुरीमार्गे

SCROLL FOR NEXT