nawab malik  file photo
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : नवाब मलिकांच्या बाबतीत अजित पवार ठाम? प्रश्न विचारताच म्हणाले, तुम्हाला काय त्रास...

Vidhan Parishad Election 2024 : नवाब मलिकांना सोबत घेण्याबाबत अजित पवार ठाम आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजपने मात्र मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मलिकांना सोबत नको, असा सूर आळवला होता. स्वतः फडणवीसांनी अजित पवारांना तसं पत्र लिहिलं होतं.

संतोष कानडे

Nawab Malik : अजित पवारांनी मंगळवारी रात्री देवगिरी बंगल्यावर नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी नवाब मलिक उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवाब मलिकांना सोबत घेण्याला भाजपने कडाडून विरोध केलेला असतानाही ते बैठकीला हजर राहिल्याने पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

नवाब मलिकांच्या हजेरीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. बुधवारी विधीमंडळात जात असताना अजित पवार यांना नवाब मलिकांच्या बैठकीला बैठकीला उपस्थित राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

उत्तरात अजित पवार म्हणाले की, तुम्हाला काय त्रास होतो का? एवढ्या एका वाक्यात अजित पवारांनी विषय संपवला. त्यामुळे नवाब मलिकांना सोबत घेण्याबाबत अजित पवार ठाम आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. भाजपने मात्र मागच्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात मलिकांना सोबत नको, असा सूर आळवला होता. स्वतः फडणवीसांनी अजित पवारांना तसं पत्र लिहिलं होतं.

दरम्यान, अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मलिकांनी बैठकीला हजेरी लावली असल्याने महायुतीमध्ये खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काहीकाळ तटस्थ भूमिका घेतली होती. पण, त्यानंतर त्यांनी अजित पवार गटाशी जवळीक दाखवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT