Nitin Desai Death Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Desai Death Case : एडेलवाइज कंपनीवर गुन्हा दाखल होणार का? अजित पवार स्पष्टच बोलले...

रोहित कणसे

Nitin Desai Death Case : प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी त्यांच्या एन.डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. यानंतर सर्व स्तरातून याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण समोर आले पाहिजे अशी मागणी देखील सर्व स्तरातून केली जात आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. यानंतर नितीन देसाईंच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल असे अश्वासन दिल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की नितीन देसाईंचा यांच्या कामाचा सर्वांना अभिमान वाटायचा. ते फार लवकर आपल्यातून निघून गेले. मी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठिशी आम्ही सगळेजण आहोत .

एडेलवाइज कंपनीवर गुन्हा दाखल होणार का?

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात एडेलवाइज कंपनीवर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, अजित पवार म्हणाले की, त्या संदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका मांडली. त्यावेळी राज्याच्यावतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित उत्तर दिलं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल.

ज्या ऑडीओ क्लिप मिळाल्या आहेत त्याच्या खोलात जाऊन कोणी मानसिक त्रास दिला ते शोधून काढलं जाईल. यामध्ये कुठलाही दबाव येऊ दिला जाणार नाही. राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही. यासाठी जर कोणी जबाबदार असतील तर कायद्यांनी जे कडक शासन व्हायला पाहिजे त्यासाठी पोलिस विभाग आणि राज्य शासन कमी पडणार नाही. याबद्दलचा विश्वास त्यांनी (देवेंद्र फडणवीस) राज्याच्या १४ कोटी जनतेला दिलं आहे असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच पोलीसांना देसाईंच्या मृत्यूपूर्वीच्या काही ऑडीओ क्लिप देखील सापडल्या आहेत. यादरम्यान नितीन देसाई याच्यावरील तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली आहे. तसेच कर्ज घेतलेल्या या कंपनीकडून वसूलीसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता का? याच्या चौकशीची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी आता एडेलवाइज एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT