Ajit Pawar Gadkari  Sakal
महाराष्ट्र बातम्या

गडकरींच्या संन्यास विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'सत्ताधारी'...

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं,” असंही गडकरी म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar On Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातून संन्यास घ्यावासा वाटत असल्याचे विधान नागपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणासह अनेक स्तरावर चर्चांना उधाण आले असतानाच आता यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तसेच ते मंत्री म्हणून फार लोकप्रिय असून, त्यांचा अनुभव फार मोठा आहे. मात्र, सत्ताधारी पक्षात असतानाही त्यांच्या मनात राजकारणातून संन्यास घेण्याची भावना येते, ही महाराष्ट्राच्या, देशाच्या जनतेने विचार करण्याची बाब आहे.

काय म्हणाले होते गडकरी

मला खूप वेळा राजकारण सोडावसं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, अशा भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे असे ते म्हणाले होते. राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं असं म्हटलं जातं,” असंही गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT