Ajit Pawar - Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : इच्छा आहे तोपर्यंतच 'मविआ'मध्ये राहू म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले...

रोहित कणसे

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आज, १८ जून रोजी वरळी येथे राज्यव्यापी शिबीर पार पडले, या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय राऊतांनी चौफेर टीका केली. तसेच महाविकास आघाडीविषयी बोलताना आपली इच्छा आहे तोपर्यंतच माविआमध्ये राहू असं वक्तव्य केलं. यावरून चर्चांना उधाण आले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्यातील विरोधीपक्षनेते अजित पवारांनी राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत काय म्हणाले होते?

वरळीतल्या शिबीरात बोलताना खासदार संजय राऊतांनी राज्यातील राजकीय वर्तुळात भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून काही नेत्यांच्या नावाची चर्चा होत आहे. यावरून राऊतांनी टीका केली आहे.

राऊत म्हणाले की, "सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पीक आलं आहे. पाहावं तिकडं भावी मुख्यमंत्री. आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. राहू. जोपर्यंत आपली इच्छा आहे तोपर्यंत. ते काही आमच्या इच्छेवर नाहीये, हे राजकारण आहे. पण आपण पाहतोय भावी मुख्यमंत्री, अरे बाबानो अजूनही विद्यमान मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) समोर बसलेले आहेत." दरम्यान राऊतांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांचं म्हणणं काय…

संजय राऊतांनी भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या नेत्यांवर नाव न घेता भाष्य केलं. सोबतच महाविकास आघाडीमध्ये राहण्याबद्दल देखील राऊत बोलले यानंतर आता विरोधीपक्षनेते अजित पवारांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत हेच मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमची आघाडी २५ वर्षे टिकणार असं म्हणायचे. तेव्हा त्यांना ती २५ वर्ष टिकावी वाटत असेल, आता त्यांनी पुढं आमचं एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. त्यात चुकीचं काय? प्रत्येक पक्ष हा काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असे अजित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT