महाराष्ट्र

Maharashtra Budget 2019 : ही काय पद्धत झाली का?, सभागृहात अजित पवार भडकले!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी थांबवला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प ट्विटरच्या माध्यमातून फोडला असल्याचा आरोप यावेळी केला. अर्थसंकल्प आधीच फोडला असल्याने आपण सभात्याग केला असल्याचेही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी ही काय पद्धत झाली का? असे म्हणत  सभागृहात अजित पवार भडकले.

अर्थसंकल्प फुटल्या वरून विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास हस्तक्षेप नोंदविला. यावेळी नेते विरोधात उभे होते. पण विरोधक आमदार मात्र जाग्यावर बसून राहिले. विधानसभेतून विरोधी पक्षांनी सभात्याग केला. अर्थसंकल्प सुरू असतानाच विरोधक सभागृहाबाहेर पडले आहेत.
 

दरम्यान, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला असून राज्यात अनेक गावांत दुष्काळ जाहीर करून, मदत पुरविण्यात आली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याचवेळी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून अर्थसंकल्पाच्या सर्व माहितीचे ट्विट करण्यात येत आहेत. यावरून विधानपरिषदेत विरोधकांनी अर्थसंकल्पीय भाषण थांबविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT