Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'राज्यभरात बॅनर लावताना शरद पवारांचा फोटो...', उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजप शिवसेना यांच्यासोबत सरकारमध्ये समावेश केला. आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तसेच, राज्याचा गाडा आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार चालवणार आहे. अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर 8 आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राज्यभरात त्यांचे बॅनर लागले आहेत. (Latest Marathi News)

काल झालेल्या राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना पोस्टर लावताना शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. आज सकाळी देवगिरी बंगल्यावरती शपथ घेतलेल्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पाठिंबा देणारे आमदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

तर राज्यभरात कुठेही पोस्टर लावणार असाल तर त्यावर शरद पवार यांचा फोटो लावण्याचे आदेश अजित पवार यांनी दिल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

राज्यात काही ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो नसल्यामुळे टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता पोस्टर वर शरद पवार यांचा फोटो असावा अशी सूचना अजित पवार यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT