ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: ‘मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच’ या विधानावर अजित पवारांची भूमिका स्पष्ट, म्हणाले...

कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता अशक्य

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

पुणे, ता. ३० ः ‘‘राजकारणामध्ये आकड्यांची जुळवाजुळव महत्त्वाची आहे. १४५ हा आकडा कोणताच राजकीय पक्ष स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही. राष्ट्रवादीचा नेता नेहमीच निवडणुकीतून ठरला आहे. पक्षातील आमचे सर्व निर्णय शरद पवार हेच घेतात,’’ असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ‘मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच’ या विधानावर पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

खराडी येथील क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठानच्या वतीने कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला पवार यांनी उपस्थिती लावली. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. या वेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथील कार्यक्रमात ‘पुढे राष्ट्रावादीचाच मुख्यमंत्री होईल’ असे विधान केले होते. त्यावर पवार यांनी ‘जयंतराव पाटील यांच्या तोंडात साखर पडो’ अशी टिपण्णी करीत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘निवडणुकांना सामोरे जाणे आणि तिथे सर्वाधिक जागा कशा निवडून येतील हा आमचा प्रयत्न असेल.

राजकारणात आकड्यांची जुळवाजुळव महत्त्वाची असते. १४५ हा आकडा राजकीय पक्ष स्वतःच्या ताकदीवर मिळवू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता नेहमी निवडणुकीतून ठरला आहे. असा कुठलाही निर्णय शरद पवार यांनी घेतलेला नाही. पवार यांनी २२ वर्षांत नेता निवडण्यासाठी लोकशाही पद्धत वापरली आहे.’’

पुस्तकाचे प्रकाशन तरी होऊ द्या!

शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या पुढील भागाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून बऱ्याच घटनांवर ऊहापोह केला आहे. याबाबत पवार यांना प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी ‘‘आधी पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मग जनतेला ते कळू द्या, त्यानंतर मत मांडू,’’ असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT