Sharad Pawar and praful patel ajit pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : प्रफुल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात? राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्याधक्ष आणि विदर्भातील नेते खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊन भाजपतर्फे आणखी एक मोठा धक्का राष्ट्रवादीला देणार असल्याचे समजते.

विशेष म्हणजे पटेल हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. विदर्भाची जबादार अनेक वर्षांपासून त्यांच्याच कडे आहे. भंडारा-गोन्दिया लोकसभेच्या निवडणुकीत परभूत झाल्यानंतर त्यांना लगेच राज्यसभेवर पाठवून राष्ट्रवादीने त्यांना मानाचे स्थान दिले आहे.

राष्ट्रवादीचे तब्बल ४० आमदार आज महाराष्ट्रातील शिंदे सेना आणि भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर ओबीसी नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आदिती या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीत बंड झाल्या नंतर पटेल आणि तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मात्र पटेल यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली नाही.

राज्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपावण्यात आली आहे. असे असले तरी राष्ट्रवादीतील झालेल्या बंडाची पटेल यांना माहिती होती. असे असताना त्यांनी ते रोखण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्यावरून दिल्लीतील सर्व हालचाली आणि वाटाघाटी पटेल यांनीच केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्या बदल्यात प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे समजते.

केंद्रात पुरोगामी आघाडीचे सरकार असताना प्रफुल पटेल हे केंद्रीय नागरी उद्दयन मंत्री होते. नागपूरच्या मिहान प्रकल्पला नागपूर विमानतळ त्यांनीच हस्तांतरात त्यांची मोठी भूमिका होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT