Ajit Pawar|Praful Patel|Sunil Tatkare  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Praful Patel: द्यायचे असेल तर कॅबिनेट द्या... फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवार स्पष्टच बोलले

Sunil Tatkare: काल आमची अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये आम्ही त्यांना आमच्या काय मागण्या आहेत त्या स्पष्टपणे सांगितल्या आहेत.

आशुतोष मसगौंडे

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकारचा आज तिसऱ्यांदा शपथविधी होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातून 6 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यात नितीन गडकरी, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, प्रताप जाधव, पीयुष गोयल आणि रक्षा खडसे हे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

दरम्यान मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याबाबत राज्यासह देशाच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सुरुवातील प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे दोघांनाही मंत्रीपद पाहिजे म्हणून त्यांच्या वाद झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर भाजप राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद देण्यास नकार देत असल्याच्या बातम्या येत होत्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीला नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात का स्थान मिळाले नाही ते सांगितले.

काय म्हणाले फडणवीस?

यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राष्ट्रवादी जिंकलेल्या जागांच्या हिशोबाने त्यांना एक राज्यमंत्रीपद देऊ केले होते. त्यांच्याकडून प्रफुल पटेल यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, पटेल माजी केंद्रिय कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना राज्यमंत्रीपद देणे योग्य वाटत नाही म्हणत राष्ट्रवादीने आज शपथ घेण्यास नकार दिला आहे. पण पुढील काही काळात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल तोपर्यंत राष्ट्रवादी थांबायला तयार आहे. म्हणून त्यांच्याकडून कोणीही आज मंत्रीपदाची शपथ घेणार नाही.

अजित पवार काय म्हणाले?

नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, मंत्रीपद प्रफुल पटेलांना द्यायचे की सुनील तटकरेंना द्यायचे याबद्दल आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. आम्ही सर्वांनी मिळून प्रफुल पटेलांचे नाव निश्चित केले आहे. भाजपने आम्हाला राज्यमंत्रीपद देऊ केले होते. पण, प्रफुल पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असल्यामुळे त्यांना पुन्हा राज्यमंत्रीपद देणे चुकीचे वाटते.

काल आमची अमित शहा, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितले की, आम्हाला द्यायचे असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या त्यासाठी आमची थांबण्याची तयारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी

Koyna Earthquake : कोयना परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले, पण नोंद झालीच नाही! नेमके काय घडलेय कोयना मापन केंद्रात? एकाच रात्रीत भूकंपाचे पाच धक्के

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; शहरातील प्रमुख १७ रस्ते राहणार बंद, अशी आहेत पार्किंगची ठिकाणे

Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

SCROLL FOR NEXT