Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'मुलांना शाळेत पाठवायचं, की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा'

उमेश बांबरे

आजपासून राज्यात शाळा सुरू झाल्या असून अद्याप 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेलं नाही.

सातारा : आजपासून राज्यात शाळा (School) सुरू झाल्या असून अद्याप 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेलं नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 12 ते 18 वर्षांच्या मुलांचे लसीकरण करावे, अशी चर्चा आहे. मात्र, केंद्राकडून (Central Government) तसा कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू केलं जाईल. परंतु, मुलांना शाळेत पाठवायचं, की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा आहे. अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, असंही पवार यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज (सोमवार) उपमुख्यमंत्र्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोविडची रुग्ण संख्या वाढू लागल्याने नगर जिल्ह्यातील 61 गावांवर निर्बंध लावले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा फटका बसू नये, यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील रुग्ण संख्या रोखण्यासाठी निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री पवारांनी सांगितले.

उसाच्या एफआरपीबाबत (FRP) राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गतवर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. राजू शेट्टी हे त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत, त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल. तसेच, कोरोना प्रादु्र्भावामुळे नगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाउन (Nagar Lockdown) करण्यात आला असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT