Ajit Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: वाचाळवीरांना शिंदे फडणवीसांनी आवरावं; अजित पवारांनी सुनावले खडेबोल

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचाळवीरांना आवराव. सरकारमधील मंत्र्यांची वागणूक चुकीची आहे. सरकार बदनाम होत आहे. अशा शब्दात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले.(Ajit Pawar press conference CM Eknath Shinde devendra fadnavis maharashtra political )

मागील आठवड्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल होत. त्यानंतर रामदास कदम यांनीही वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच, मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या फायर ब्रिगेड सुषमा अंधारे यांचा नटी, बाई असा उल्लेख केला होता.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. शिंदे फडणवीस सरकारमध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. सरकारमधील मंत्र्यांची वागणूक चुकीची आहे. सरकार बदनाम होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाचाळवीरांना आवराव अशा शब्दात अजित पवारांनी खडेबोल सुनावले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

मी दिवाळीपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेगवेगळी भेट घेऊन त्यांना इशारा दिला होता. तुमच्या सरकारमध्ये वाचाळवीरांचं प्रस्थ वाढलंय. यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय, लक्ष ठेवा, असं समजावलं होतं. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तणावाखाली काम करतायत. मंत्रीपदावरील व्यक्ती काहीही बोलून नंतर मी सहज बोललो असं म्हणतायत… पण सहज बोलायला तुम्ही सामान्य नाहीत. मंत्री पदावर आहात, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात अजित पवार सत्ताधारी मंत्र्यांची कानउघडणी केली.

तसेच, लोक ऐकत, पहात असतात. लक्षात ठेवत असतात, असं सांगितलं होतं… मंत्री काहीही वक्तव्य करतात.. चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, दूध पाहिजे का असं सामान्य लोक विचारतात. पण त्यानंतरही दारू पाहिजे का… असं विचारण्यापर्यंत मजल गेली आहे.

नंतर मी हे सहज म्हणालो, असंही बोलतात. हे सहज बोलायला तुम्ही समान्य नागरिक नाहीत. मंत्री आहात. जबाबदार आहात, अशा शब्दात अजित पवार यांनी सत्तार यांची कानउघडणी केली.

मंत्रि पदावर असताना घटना, नियम यांचा आदर करायचा असतो. अंबरनाथमध्ये दिवसा-ढवळ्या बैलगाडा शर्यतीवरून गोळीबार घडला. सरकार काय करतंय? ठाणे जिल्ह्यात किसन नगरमध्ये दोन गटात राडा झाला, पोलीस यंत्रणा राजकीय वाद सोडवण्यात बिझी झाली तर उर्वरीत कामं कोण करणार असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT