Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : ''रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेतली'' अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळेंवर बोलले

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. अजित पवारांनी थेटपणे नाव घेतलं नसलं तरी अप्रत्यक्षपणे नाराजी बोलून दाखवली.

आज प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. फ्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारी अध्यक्ष या नात्याने प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील यांची हकालपट्टी करुन सुनिल तटकरे यांची नेमणूक केली. यावेळी सर्वच नेत्यांनी आम्हीच खरा पक्ष आहोत, असं म्हणत त्यांनी त्यांचं संख्याबळ सांगावं, असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, अजित पवार बोलतांना म्हणाले की, आम्ही कुणावर कारवाई करायला बसलेलो नाहीत. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे. परंतु काल रात्रीपासून काही वेगळ्या घटना घडल्या. रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेतली गेली, असा उल्लेख अजित पवारांनी केला.

काल मध्यरात्री सुप्रिला सुळे आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यातून सुप्रिया सुळेंनी ९ आमदारांवर कारवाईचे संकेत दिले होते. तर जयंत पाटलांनी आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे अजित पवारांना नाराजी बोलून दाखवली. पहिल्यांदाच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटावर नाराजी व्यक्त केली.

अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय राज्याचा आणि राष्ट्रवादीच्या भल्याचा निर्णय आहे. सुनील तटकरे हे अध्यक्ष झाले आणि काही निर्णय घेतले आहेत. विरोधी पक्ष नेता नेमण्याचं काम विधानसभा अध्यक्ष यांचं आहे. जास्त संख्या असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेता हे पद मिळतं. मात्र आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं अजित पवार म्हणाले.

बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत - अजित पवार

आम्ही महाराष्ट्राचा भल्यासाठी काम करत राहणार आहोत. जास्त आमदार आमच्यासोबत आहेत, असं अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय, त्यांच्या पाठीशी उभं राहून राज्याच्या हितासाठी काम करणार आहे. केंद्रात राज्यात वेगळी सरकारे असतील तर निधी कमी मिळतो, आम्हीच राष्ट्रवादी पक्षाच्या हिताचे करतो आहोत. त्यांना नोटिस काढण्याचा अधिकार नसून पक्ष आणि चिन्ह आमच्यासोबत आहे, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT