Ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit pawar: मी कधीही चुकीच बोललो नाही; 'त्या' वक्तव्यावर अजित पवार ठाम

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा स्वतंत्र्य अधिकार असतो.

इतिहासाच्या आधारावर विधानसभेत बोललो. संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणायला हवं. मी माझी भूमिका मांडली. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी स्विकारावं. कुणी धर्मवीर म्हणेल तर तो त्यांचा प्रश्न. स्वराज्यात सगळ्या जाती धर्माचे लोकं. अनेकांनी स्वतःला धर्मवीर म्हणून घेतलं. असा टोमणा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

तसेच राज्यपालांविरोधात भाजप गप्प का? असं मी कोणता गुन्हा केला आहे. असं मी काय चुकीच महाराजांबद्दल काय बोललो. असा सवालही पवार यांनी उपस्थित केलाआणि माझा राजीनामा मागणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. असही पवार यावेळी म्हणाले.

स्वराज्याच्या रक्षणात सर्व काही आलं. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराज यांना न्याय देणार. द्वेषाचं राजकारण मला मान्य नाही. सूडबुद्धीने राजकारण केलं जात आहे. असा आरोप पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

वादग्रस्त विधान मी केलेलं नाही. मी माझ्या विधानाशी ठाम आहे. वादग्रस्त विधान राज्यपाल, भाजप नेत्यांनी केलं आहे. मी शरद पवार यांच्याशी सहमत आहे. आंदोलन करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावं. मी वादग्रस्त विधान केलं नाही. हे सर्व घडवणाला मास्टरमाईंडी त्यावेळी विधानसभेत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT