ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: तो खरचं भाजपचा कार्यकर्ता आहे का?, अजित पवारांचा सवाल

तुझा लवकरच दाभोळकर होणार

धनश्री ओतारी

अधिकाऱ्यांना न भेटता थेट जे गृहमंत्रालय सांभाळतात त्यांनाच सांगण योग्य आहे, अस मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकीच्या घटनेवर दिलं आहे. (ajit pawar reaction on Sharad Pawar death threat Maharashtra Politics )

तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटद्वारे देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या तातडीने पोलीस आयुक्तांना भेटल्या आहेत. धमकी देणार व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडींवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

धमकी देणाऱ्याची मी माहिती घेतली. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले. पण तो खरचं भाजपचा कार्यकर्ता आहे का हे पहावं लागेल. त्यांच्या पक्षांना बोलायला सांगितलं आहे का? असे सवाल अजित पवारांनी यावेळी उपस्थित केले.

या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला पण ते इथं नाहीत. दोन दिवस ते राज्यात नसल्याचे समजले. त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला तर ते तर फोन लागला नाही. ते मुंबईमध्ये आहेत. अधिकाऱ्यां न भेटता थेट जे गृहमंत्रालय सांभाळतात त्यांनाच सांगण योग्य असल्याच माझं मत आहे.

कोण मास्टरमाइंड आहे त्याची सखोल चौकशी करायला हवी. धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई व्हावी. त्याला अटक झाली पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यायला हवी. धमकी देण्याचे प्रकार वाढले आरहे. त्याचा मी गंभीर निषेध करतो. असं अजिच पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT