pawar.jpg 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार राष्ट्रवादीत पुन्हा सक्रीय; बैठकीत थेट मंचावर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : य़शवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सध्या त्यांचं स्वागत करत आहेत. सोशल मीडियावरही कार्यकर्ते अजित पवारांचे आभार मानत असून अनेकजण अजित पवारांनी भाजपासोबत जाणं शरद पवारांची खेळी होती असा दावा करत आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी रात्री शरद पवारांची भेट घेत पुन्हा सगळं काही आलबेल झालं असल्याचं दाखवून दिलं.

आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आदी नेते उपस्थित आहेत. सर्व आमदारांची आता बैठक झाली आहे. या बैठकीत मंत्रीपदांविषयी देखील चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. या ठिकाणी ते पाच आमदार देखील उपस्थित होते. अजित पवार यांनी त्या आमदारांची बैठक घेतल्याचेही बोलले जात आहे. या बैठकीतील तपशील मात्र समजू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT