Ajit Pawar Replied Devendra Fadnavis  e sakal
महाराष्ट्र बातम्या

'हे फडणवीसांकडून अपेक्षित नव्हतं', अजित पवारांचं अर्थसंकल्पावर उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर (Maharashtra Budget) केला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली. त्यालाच आज अजित पवारांनी विधानसभेत उत्तर दिले आहे. राज्याचा गाडा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात चालेल अशी सोय या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले.

गुजरातचा अर्थसंकल्प सादर करत असतील तरी केंद्र आणि राज्य अशा दोन्ही घोषणा मिळून अर्थसंकल्प सादर करतात. टीका करायची म्हणून टीका करू नका. अर्थसंकल्प फसवा असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पण, हे सर्व आरोप खोटे आहेत. अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोरोना काळात कर्मचाऱ्यांचं सर्वांनी स्वागत केलं. पण, काही लोक आता कोरोनावरून टीका करत आहेत. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडलाय. कोरोनाला हलक्यात घेऊ नका. चीनमध्ये पुन्हा १५ शहरं बंद आहेत, असं अजित पवार म्हणाले.

'हे फडणवीसांकडून अपेक्षित नव्हतं' -

राष्ट्रवादीला सर्वाधिक निधी दिला, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्याला देखील अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून हे अपेक्षित नव्हतं. एखादं खातं आपल्याकडे असल्यामुळे ते पैसे त्या व्यक्तीचे नसतात. सरकार आणण्यासाठी तुम्ही मुद्दाम प्रयत्न करताय. पण, असं काहीतरी सांगून तुम्ही वस्तूस्थिती बदलू शकत नाही, असं अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरातांना काही कळतंय का? असं शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटेल. पण, अर्थसंकल्पावर शेवटची सही मुख्यमंत्र्यांची असते. आपल्या पक्षाला सर्वाधिक निधी देण्याचा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिनपैकी कोणताही पक्ष करत नाही, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT