ajit pawar onion esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : सहा दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार?, अजित पवार म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः नाशिक बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी मागील सहा दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक संपन्न होत असल्याचं पवारांनी सांगितलं.

नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत; असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय बाजार समित्यांमध्ये लादलेले खरेदी शुल्क रद्द करुन बाजार फीस एक टक्क्यांवरुन अर्धा टक्का करावी, या व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va5lUnmL2ATqrDIlKh0V

व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केलीय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत आज (मंगळवारी) रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे कृषीमंत्री, पणनमंत्री, व्यापारी, पाच मार्केट कमिटीचे चेअरमन, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या विचार करुन कांदा खरेदीबाबत निर्णय घेतला जाईल. जीएसटीसंदर्भातही चर्चा होईल, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे उद्यापासून नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरु होऊ शकते. बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, यावर व्यापारी निर्णय घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT