Devendra Fadnavis ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

''मराठवाड्याचं पाणी बारामतीने पळवलं नाही, विलासरावांच्या नेतृत्वाखाली झाला होता एक निर्णय'' पवार म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः मराठवाड्याच्या हक्काचं पाणी बारामतीने अडवलं होतं, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या काळातील एका निर्णयाची आठवण करुन दिली आहे.

मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग आहे. राजकीय अनास्थेने मराठवाड्याला पाण्यापासून दूर ठेवलं, असं नेहमीच बोललं जातं. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवर ताशेरे ओढत मराठावाड्याच्या हक्काचं पाणी अडवलं होतं, असा आरोप केला.

''मराठवाड्याच्या हक्काचं पाणी बारामतीमध्ये अडवण्यात आलं होतं. परंतु आमच्या सरकारने कृष्णा प्रकल्पातील बोगद्याला निधी देऊन कामाला सुरुवात केली. त्यासंबंधीच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेलाही मागच्या सरकारने अडीच वर्षे रोखून धरलं. त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय झाला'' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात स्व. विलासराव देशमुख यांच्याच नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी नगर येथे बैठका झाल्या होत्या. तेव्हा बीड आणि उस्मानाबादला मिणाऱ्या पाण्यासंदर्भात निर्णय झाला होता. महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळाच्या अधिकारामध्ये येणारं हक्काचं पाणी देण्यासंदर्भात निर्णय झाल्यातं ते म्हणाले.

उजनीमधून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्याला देण्याचा निर्णय झाला मात्र बोगद्याचं काम झालं नाही, त्यात बारामतीचा काय संबंध? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT