ajit pawar ajit pawar
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं..

राज्याच्या राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला अजित पवार केंद्र बिंदू ठरलेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला अजित पवार केंद्र बिंदू ठरलेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. परंतु नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही या वृत्तात म्हटलं आहे. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली नाही: अण्णा बनसोडे

दरम्यान, अजित पवार हे विधीमंडळातील आपल्या कार्यलयात पोहोचले आहेत. इथे ते गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच अनेक आमदार मुंबईत दाखल झालेत. काही वेळात आलेले आमदार अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली आहे. तसंच दादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, आम्ही कायम त्यांच्यासोबत असू असंही बनसोडे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT