महाराष्ट्र बातम्या

अजितदादा म्हणाले, ‘एवढा पाऊस पडला की..’

अजित झळके

सांगली : कोयना धरणातून (Koyna Dam) आपण पाणी कमी सोडले, पण धरणाच्या बाहेर एवढा पाऊस पडत होता की धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करूनही त्याचा फार परिणाम झाला नाही, अशी हतबलता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज येथे स्टेशन चौकात पूरस्थितीची पाहणी करताना व्यक्त केली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह पवार यांनी आज सांगली शहरातील पूरस्थितीची पाहणी केली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली. येथील स्टेशन चौकात दुपारी साडेबारा वाजता अजितदादांचा ताफा दाखल झाला आणि सुमारे पंधरा ते वीस मिनिटे त्यांनी पाहणी केली. त्यात त्यांनी नकाशाव्दारे पाणी कसे पसरले हे समजून घेतले.आयुक्त कापडणीस यांच्याशी चर्चा करताना त्यांनी शहरात किती पाणी पसरले आहे, किती लोक बाधित आहेत, व्यापारी पेठांची काय स्थिती आहे, हे समजून घेतले.

शहराचा नकाशा पाहून त्यांनी प्रलयाचा अंदाज घेतला. नेमका पूर का वाढला, याची कारणमिमांसा करताना त्यांनी धरणक्षेत्राच्या बाहेर पडलेल्या अतिवृष्टीचा अल्लेख केला. धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन योग्य झाले असले तरी या अतिवृष्टीने पाणी वाढतच राहिले, त्याचा मोठा फटका बसला, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवार यांनी पलूस येथून महापूर पाहणी दौऱ्याला सुरवात केली. तेथे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, आमदार विश्‍वजीत कदम सोबत होते. त्यानंतर सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सांगली शहरातील महापुराची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली

Protein-Packed Boiled Peanut Chaat: प्रोटीनचा खजिना, चवीतही नंबर वन! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा उकडलेल्या शेंगदाण्यांचा हेल्दी चाट

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

SCROLL FOR NEXT