Ajit Pawar - Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित दादांमुळे शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चामुळे शिंदे गटालाही धक्का बसू शकतो. त्यातच शिंदे गटाचे नेते यांनी अजित पवारांबाबत बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे.

यावेळी शिरसाट यांनी अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, नागपूर येथे आयोजित वज्रमुठ सभेत अजित पवार यांना बोलू दिलं नाही. १० मिनिट बोलू दिलं असतं तर काय झालं असतं. मात्र त्यांना बोलू दिलं नाही. तसेच धनंजय मुंडे यांनी मला सांगितलं होतं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांचेही फोन उचलत नव्हते. तेव्हापासूनच अजित पवार यांची नाराजी आहे, असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला.

दरम्यान १५ आमदार असणाऱ्या पक्षाचा प्रमुख वज्रमुठ सभेत मुख्य भाषण करतो. पण अजित पवार यांना बालू दिलं गेलं नाही. हे देखील नाराजीचं कारण असू शकतं. अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे होऊन आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं असेल तर आमची विचारसरणी मान्य करावी लागले. मात्र अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह भाजपसोबत गेले तर शिंदे गट अर्थात शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असंही शिरसाट यांनी नमूद केलं.

संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून नाराज आहेत. मात्र अजित पवार यांची नाराजी आणि आमची सर्वोच्च न्यायालयातील केसचा काहीही संबंध नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : सौरव गांगुलीला ED ची नोटीस अन् घरावर छापे? भारताचा माजी कर्णधार संतापला; थेट पोलिसात तक्रार, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : शिवसेना अधिक बळकट होणार असल्याचा दीपक केसरकर यांचा दावा

Pune News: पुनावळेतील ९१ गुंठ्यांचा शैक्षणिक भूखंड खासगी संस्थेला; स्थानिक नगरसेवकांच्या विरोधानंतरही प्रस्ताव मंजूर, महापालिकेच्या सभेत मोठा निर्णय!

Accident: चालकाचा ताबा सुटला अन्..., १६ प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Mulank : 'या' 3 मुलांकाचे लोक सतत आजारी पडतात, शनीच्या साडेसातीमुळे रोज येतात नव्या अडचणी, पाहा यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT