ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार-PM मोदींच्या भेटीसंदर्भात अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले..

काहीजणांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

काहीजणांकडून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. संजय राऊत हे नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त मोठे आहेत का? राऊतांबद्दल बोलले पण नवाब मलिक किंवा अनिल देशमुख यांच्याबाबतीत काहीच चर्चा नाही यावर अजित पवार यांना विचारण्यात आले. ते म्हणाले की, एखादी गोष्ट आपण सांगायला गेलो तर सर्व काही सांगितलं जात नाही, साहेबांनी सांगितलं की जे महत्त्वाचे विषय होते त्या सर्व विषयांवर देशाच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे. जाणीवपूर्वक काही लोकं बातम्यांचा विपर्यास करून समाजामद्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.

पवार पंतप्रधानांना भेटले, त्यात ईडीच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली यावरून विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, “शरदराव पवारांनी त्यांना जे काय वाटतं ते बोलले आहेत. एकदा पवारसाहेब बोलल्यानंतर आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित दिसत नाही.”

निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेना, काँग्रेसचे नेते करत असल्यावरून विचारले असता अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादीचे नेतेही अशी तक्रार करतात. अशी तक्रार होण्याचं एकमेव कारण म्हणजे कोरोनामुळे निधीला मर्यादा होत्या. आहे त्या निधीत राज्याच्या विकासाला खीळ बसु द्यायची नव्हती. त्यात आमदारांचा निधी पाच कोटी पर्यंत वाढवला. जे जे करता येणं शक्य होतं ते केलं. कोणत्याही जिल्ह्याच्या वार्षिक योजनेत किंवा विकासासाठी जाणाऱ्या निधीत कपात केली नाहीय. PWD विभागाला रस्ते आणि इमारतीच्या बांधकामाला राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा २१ हजार कोटींचा निधी दिला.” अशी माहितीसुद्धा अजित पवार यांनी दिली.

एसटी संपात कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की,'' ३० मार्चपर्यंत अनिल परब यांनी अल्टिमेटम दिला होता. १ एप्रिलपर्यंत कामावर येणार्यांना कामावर रुजू करून घेण्याचंही सुतोवाच केलं होतं. हायकोर्टात प्रकरण प्रलंबित असल्यानं काही कामगारांना सांगण्यात आलं की निकाल लागेपर्यंत थांबण्यास सांगितलं. आज याबाबत न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे. न्यायव्यवस्था जेव्हा निर्णय देते तेव्हा तो सर्वांना बांधिल असतो.''

कांजूरमार्ग मेट्रो स्टेशनबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यामधला वाद मिटवावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘’याबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन तीनवेळा माहिती दिली आहे. काम करत असताना वाद होऊ नये हीच आमची धारणा आहे. केंद्र सरकारचे अधिवेशन सुरु आहे. आमच्या राज्यसभा, लोकसभा सदस्यांना याबाबत मुद्दा उपस्थित करायला सांगूटट असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT