Ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : "...तेव्हाच मी 'पहाटेच्या शपथविधी'बाबत खरं सांगेन"

काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चर्चेचा मुद्दा ठरला आहे. पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार यांना सातत्याने प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मी मला जेव्हा वाटेल तेव्हा मी सविस्तर बोलेन, असंही अजित पवार यांनी याधीच स्पष्ट केलं आहे. मात्र, अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर प्रश्न विचारले जातात. आता, पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आत्मचरित्र लिहिन तेव्हा सगळं खरं खरं लिहीन, असे अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीबद्दल गौप्यस्फोट केला होता. या शपथविधीची माहिती शरद पवारांना होती, असे फडणवीस यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर, पुन्हा एकदा भाजप-राष्ट्रवादी युतीची चर्चा राज्यात रंगली. मात्र, फडणवीसांनी सांगितलेली माहिती चुकीची असल्याचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता, अजित पवार यांना पुन्हा एकदा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नावर, मी याबाबत आत्ताच बोलणार नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बोलेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले की, ज्यावेळी मला वाटेल आत्मचरित्र लिहावं, त्यावेळी मी लिहीन आणि आत्मचरित्रात सगळ्या गोष्टी लिहिन. अगदी सुरुवातीपासूनच सगळं लिहीन, ते वाचल्यावर कुणाला काय वाटेल, ते वाटेल परंतु मी त्यामध्ये सगळं खरं खरं लिहिन. मला त्याची किंमत मोजावी लागली तरी मी ते लिहीन, असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT