Ajit Pawar News Updates Ajit Pawar
महाराष्ट्र बातम्या

मी मास्क काढून भाषण केलेलं कधी पाहिलं आहे का?

सकाळ डिजिटल टीम

मोठा गाजावाजा करून सोमवारी खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईत बाहेरून शिवसैनिकही आले होते. काल गर्दी झाली असे गालबोट कधीतरी लागत असते. मी स्वतः मास्क लावतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियमावली पाळतात. मी मास्क काढून भाषण केलेले कधी पाहिले आहे का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. काही लोक उत्साहाच्या भरात गर्दी करीत आहेत. सगळ्यांनी जबाबदारी योग्य पाडावी, असेही अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar News Updates)

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवला. तिन्ही पक्षात मतांतर होणार नाही याची काळजी घेतली जाते. मत स्वातंत्र्य असले तरीही ही महाराष्ट्राची परंपरा नाही. मतांची विचारधारा वेगळी असू शकते; पण यापूर्वी अशी कटुता कधीच नव्हती. यापूर्वीही सरकार वेगवेगळी आली. महाराष्ट्राला न शोभणारी वक्तव्य केली जात आहेत, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत जो प्रश्न आहे तो घरातील आहे. बसून मार्ग काढला जाईल. हेरिटेज इमारतींना बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोरेगावला होणाऱ्या हॉस्टेलमध्ये ७५ टक्के महाराष्ट्र आणि २५ टक्के महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना फायदा होईल. महाविकास आघाडीचे (mahavikas aaghadi) सरकार शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांनी आणले आहे. ते हे ठरवतील तसे आम्ही काम करीत आहोत. राज्याचे प्रमुख जे ठरवतील ते होईल. संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालत आहे, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

विदर्भावर अन्याय होतोय असे नाही

नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे विदर्भाऐवजी मुबंई अधिवेशन घ्यावे लागत आहे. विदर्भावर अन्याय होतोय असे नाही. विदर्भाला योग्य निधी मिळावा असा आमचा प्रयत्न असतो, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT