ajit pawar takes Charge of office inform girish mahajan 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांनी पदभार स्वीकारला; भाजपनेत्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु माजी मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगितले आहे.

गिरीश महाजन यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना शुभेच्छा दिल्याचे ट्विट केले आहे. महाजन म्हणतात, महाराष्ट्राच्या विकासासाठी व स्थिर सरकार मिळावे म्हणून एकत्र येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी शपथ घेऊन पदभार स्वीकारला आहे. त्या दोघा नेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन !

दरम्यान, शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज फडणवीस यांनी पदभार स्वीकारला परंतु अजित पलार यांनी पदभार स्वीकारला नसल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे भाजपनेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता गिरीश महाजन यांनी ट्विट करत अजित पवार यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगत या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Loggerhead Turtle: अरबी समुद्रातून १०० किलो वजनाच्या दुर्मिळ 'लॉगरहेड' कासवाची सुटका

Pune Bengaluru Highway : पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड हाय-वे' अधांतरी! गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट रखडला? महामार्गाचे रेखांकनही थांबवले, PM कार्यालयाकडून मान्यता का नाही?

पदवीदान सोहळ्याला जायचा प्रश्नच नाही; NALSARच्या निमंत्रणावर CJI सूर्यकांत यांची प्रतिक्रिया

Marathi News Live Updates : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदूबाबावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा; आरोपी फरार

SCROLL FOR NEXT