Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar-Praful Patel यांच्यात अनऑफिशियल कुजबूज पण माईक सुरूच होता; नेमकं काय म्हणाले...

अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर काय बोलत होते?

दत्ता लवांडे

मुंबई : राष्ट्रवादीतून फुटून एक गट सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारला मिळाल्यानंतर अजित पवार गटाने काल पत्रकार परिषद घेऊन आपल्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अमोल मिटकरी, रूपाली चाकणकर यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, या पत्रकार परिषदेवेळी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये काहीतरी अनऑफिशियल बोलणं सुरू होतं पण यावेळी पत्रकार परिषदेतील माईक सुरूच होता. त्यांच्यातील कुजबूज यामध्ये रेकॉर्ड झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये शरद पवार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत कुजबूज करत असून "त्यांना अपात्र करायचं" असं ते बोलताना दिसत आहेत. यावर प्रफुल्ल पटेल कुणाला? असा प्रतिप्रश्न करतात. त्यावर अजित पवार हे जयंत पाटील यांचं नाव घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अजित पवार गटाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी, अजित पवार यांची विधीमंडळ नेते पदी आणि अनिल पाटील यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पक्षातील इतर पदांवरील नियुक्त्यांचे सर्व अधिकार हे तटकरे यांना देण्यात आले आहेत.

अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याचा आणि जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त निर्णय घेण्यात आला आहे. तर शरद पवार गटाने पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबीत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT