ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार नाराज? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला दुसऱ्या दिवशी गैरहजर

रवींद्र देशमुख

मुंबई - शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांचे विधान ताजे असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीबाबत वृत्त आलं आहे. (Ajit Pawar news in Marathi)

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर सुरू आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हजर आहेत. शिवाय आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील हजर होते. मात्र अजित पवार शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पोहोचले नाहीत. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतील कार्यक्रमात अजित पवार नाराज होऊन निघून गेले होते. मात्र त्यावेळी आपण नाराज नसून लघुशंकेला गेलो होतो, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराच्या आज दुसरा दिवस असूनही अजित पवार मेळाव्याला आलेले नाहीत.

दरम्यान शरद पवार हजर असलेल्या कार्यक्रमात अजित पवार सहसा जात नाहीत. मेळावा कालपासून सुरुवात झाली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार हजर न राहिल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार हे त्याच्या आजोळी एका कार्यक्रामासाठी गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT