Ajit Pawar Vs Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Vs Sharad Pawar: अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांऐवजी यशवंतराव चव्हाणांचा फोटो

सकाळ डिजिटल टीम

Ajit Pawar Vs Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचे समर्थकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी त्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. याचे कारण म्हणजे त्या बँनरमध्ये लावण्यात आलेले फोटो.

आजच्या नाशिक येथील कार्यक्रमात अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला नाहीये. तर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामुळे हे होर्डिंग चर्चचा विषय ठरत आहे.

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे २ गट पडले. सुरुवातीला अजित पवार गटाकडून त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला.

मात्र त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार गटाला सांगितलं होते कि, 'माझा फोटो कुठेहि वापरू नका. माझा नाव वापरू नका'. त्यानंतर आज नाशिकमध्ये बँनरवर शरद पवारांचे फोटो दिसत नाहीयेत. मात्र त्यांच्या जागी आता यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेत प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रिलॅक्स झोन’ची सुरूवात

SCROLL FOR NEXT