Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Meeting: मंत्रिमंडळाचे 'हे' निर्णय अजित पवारांना पटले नाहीत? सही न करताच दहा मिनिटांतच कॅबिनेट सोडली

NCP Ajit Pawar: काही जमिनींसंदर्भात अर्थ विभागाने विरोध दर्शवल्यानंतरही कॅबिनेट बैठकीमध्ये ते विषय ऐनवेळी मांडण्यात आले, विविध संस्थांना जमिनी देण्यासंदर्भात निर्णय होत असल्याने अजित पवार नाराज होते, अशी चर्चा आहे.

संतोष कानडे

Ajit Pawar News: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या काही निर्णयांमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कारण त्यांनी केवळ दहाच मिनिटांमध्ये कॅबिनेटची बैठक सोडली. अजित पवारांच्या नाराजीचा परिणाम महायुतीच्या नात्यामध्ये होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अजित पवारांच्या मनाजोगी गोष्ट झाली नाही अथवा त्यांना काही पटलं नाही तर ते त्याजागी थांबत नाहीत, असं आजवर घडलेलं आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हेच घडलं. कॅबिनेटमध्ये ३८ निर्णय घेण्यात आले. मात्र अजित पवार दहाच मिनिटांत निघून गेले.

शेवटच्या क्षणाला महत्त्वाचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडत असल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते निघून गेले. मात्र तिथून पुढे अडीच तास ही बैठक चालली आणि अनेक निर्णय सरकारने घेतले.

काही जमिनींसंदर्भात अर्थ विभागाने विरोध दर्शवल्यानंतरही कॅबिनेट बैठकीमध्ये ते विषय ऐनवेळी मांडण्यात आले, विविध संस्थांना जमिनी देण्यासंदर्भात निर्णय होत असल्याने अजित पवार नाराज होते, अशी चर्चा आहे.

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नॉन क्रिमिलेयरची उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांवरुन पंधरा लाख रुपयांपर्यंत करण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस, घराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घर देण्याचा निर्णयही घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून गुरुवारी झालेल्या या बैठकीत ३८ निर्णय घेण्यात आले.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांच्या नाराजीचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, माझा नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी मला विमानतळावर जाणे गरजेचे होते. कॅबिनेटची बैठक ११ वाजताची होती, परंतु ती नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरु झाली. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन मी निघून गेलो, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

Winter Fashion: हिवाळ्यात 'कम्फर्ट' आणि 'स्टायलिश' राहायचंय? मग स्मिता शेवाळेच्या खास टिप्स फॉलो करा!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Satara Politics: काहींना न्याय देऊ शकलो नाही: खासदार उदयनराजे भोसले; नाराज असलेल्याबाबत नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

SCROLL FOR NEXT