Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : अजित पवार साधणार जनतेशी संवाद ; जनसन्मान यात्रेला गुरुवारपासून दिंडोरीतून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून (ता. ८) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून (ता. ८) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी दिली.

लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच आम्ही ‘जनसन्मान यात्रा’ हे नाव ठेवले आहे, असे सुरुवातीला सांगतानाच काही योजना अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिल्या, त्या जनतेपर्यंत पोचवाव्यात हासुद्धा जनतेचा एकप्रकारे सन्मान आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून करणार आहोत. यानिमित्ताने समाजातील सर्व घटकांशी पवार थेट संवाद करणार आहेत. ही यात्रा योजनांपुरती मर्यादित न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या भावना काय आहेत हे सुद्धा यातून जाणून घेतले जाणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

यात्रेचा कार्यक्रम

  • पहिल्या टप्प्यात सलग पाच दिवसांचा दौरा

  • कार्यकर्त्यांचा सन्मान, सर्वसामान्य जनतेशी संवाद हा महत्त्वाचा भाग

  • दररोज सायंकाळी महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधणार

  • महायुतीमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, ही यामागची भूमिका

  • प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन सभा किंवा कार्यक्रम

  • महिला, युवक, शेतकरी, आदिवासी आणि उपेक्षित घटकांशी अजित पवार संवाद साधणार

  • १५ ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सुरू होणार

  • २ ऑगस्टपर्यंत यात्रा मुंबईत येईल

  • विदर्भातून २६ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT