Ajit Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'अजित पवार शांत बसणार नाहीत, दिवाळीपर्यंत ते आमदारांची जमवाजमव करतील', आणखी एक गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याबाबत एक विधान केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. मात्र अजित पवारांनी नंतर या वावड्या असल्याचं स्पष्ट केलं.

शरद पवार यांनी २ मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती. काल पवारांनी त्यांचीच घोषणा मागे घेतली. यामागे शरद पवार यांची खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार यांनी अजित पवारांसंबंधीच्या चर्चा किंवा संभाव्य पक्षप्रवेश थोपवण्यासाठी ही खेळी केल्याचं सांगितलं जातं.

शरद पवार यांनी काल निवृत्तीची घोषणा मागे घेतल्यानंतर सगळ्यांच्या नजरा अजित पवारांवर होत्या. याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना विचारण्यात आलं असता त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांसंबंधी विधान केलं आहे. अजित पवार यांची अवस्था 'घर का ना घाट का'अशी झाल्याचं त्या म्हणाल्या.

'अजित पवार हे शांत बसतील असं वाटत नाही, कदाचित दिवाळीपर्यंत ते पुन्हा आमदारांची जमवाजमव करतील आणि मोठा दगाफटका करतील' असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भूमिकेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया

  • घर का ना घाट का, अशी अजित पवारांची परिस्थिती झाली आहे

  • ते शांत बसलीत असं वाटत नाही

  • कदाचित दिवाळीपर्यंत त्यांच्या आमदारांना सोबत घेऊन ते मोठा दगाफटका करतील

  • राजकारणाचा उकिरडा करुन ठेवला आहे

  • माझीच बॅट आणि माझाच बॉल अशी शरद पवारांची स्थिती आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT